हवाईदल स्थापनादिनी सचिनला ग्रुप कॅप्टन पदाने सन्मानित

हवाईदल स्थापनादिनी सचिनला ग्रुप कॅप्टन पदाने सन्मानित

भारतीय हवाईदल स्थापना दिनाच्या निमित्ताने क्रिकेटचा विक्रमवीर, भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात गुरुवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

हवाईदल स्थापनादिनी सचिनला मानद ग्रुप कॅप्टन करण्यात आले. अशा प्रकारे हवाईदलाकडून सन्मानित होणारा तो भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे.

सचिन तेंडुलकरला यापूर्वी हवाईदलाने फ्लाईंग ऑफिसर या मानद उपाधीने सन्मानित केले आहे. भारतामध्ये हवाईदलाची स्थापना होऊन आज ८३ वर्षे होत आहेत. इंग्रजांच्या काळात हवाईदल स्थापन करण्यात आले होते. त्या काळात भारतीय हवाईदलाला रॉयल इंडियन एअरफोर्स असे नामकरण करण्यात आले होते.

गाझियाबादमध्ये यानिमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवाई कसरतीही करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *