कोल्हापूरी चपलाची शानच निराळी, आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंटमध्ये झळकली

कोल्हापूरी चपलाची शानच निराळी…रूबाबदार, सुबक आकार आणि आरामदायी हि चप्पल, प्राडा या आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंटमध्ये पाहायला मिळाली… फॅशन वीकच्या रॅम्पवर मॉडेल्स कोल्हापूरी पायताणात दिसले…मात्र, खास गोष्ट म्हणजे या चपलांची किंमत होती तब्बल 1 लाख रुपये.

हे पाहा, कोल्हापूरी पायताण घालून रॅम्पवॉक केला जात आहे. महाराष्ट्राची शान असलेली कोल्हापूर चप्पल नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य फॅशन इव्हेंटमध्ये दिसली. Prada या लक्झरी ब्रँडने आपलं समर कलेक्शन 2025 सादर केलं. फॅशन वीकच्या रॅम्पवर मॉडेल्स डिझायनर कपडे, बॅग्ज आणि आलिशान अ‍ॅक्सेसरीजसह अवतरले होते. पण सर्वांच्या नजरा खिळल्या कोल्हापुरी चप्पलेकडे.

भारतीय परंपरेचा अभिमान असलेल्या कोल्हापुरी चपला आता आंतरराष्ट्रीय फॅशनमध्येही झळकू लागल्या आहेत. आणि थोडी थोडकी नाही तर या चपलांची किंमत लावली होती तब्बल 1 लाख रुपये.

प्रसिध्द कोल्हापुरी चप्पलाच शहर म्हणून कोल्हापूरला ओळखल जात. याच कोल्हापुरातून उगम पावलेली ही चप्पल भारतात कित्तेक दशके लोकप्रिय आहेत. या चपला केवळ ग्रामीण भारतातच नव्हे, तर शहरी आणि स्टायलिश कपड्यांमध्येही उत्तम शोभून दिसतात. स्थानिक कारागिरांची ही कला आता आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या डिझाईनमध्ये स्थान मिळवू लागली आहे, हे अभिमानास्पद आहे. पण कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तब्बल एक लाख रुपये किंमत प्राप्त झाल्याचा ऐकून कोल्हापुरातील चप्पल व्यवसायिकांनी आश्चर्य व्यक्त केलय

कोल्हापुरी चपलाची वैशिष्ट्ये

–कोल्हापुरी चप्पल पारंपरिक पद्धतीने कारगीर हाताने बनवतात
–या चपला मजबूत चामड्याच्या असतात, त्यांचे विणकाम हे त्यांचे खास वैशिष्ट्य
–कोल्हापुरी चपलांना 2019 मध्ये GI टॅग मिळालंय
–कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटक राज्यातील धारवाड, बेळगाव, बागलकोट या जिल्ह्यांना GI टॅग
–या चपलांची विशिष्टता आणि पारंपरिकता फक्त काही ठरावीक भौगोलिक भागांशी संबंधित
–प्राडाने फॅशन शोमध्ये चपलांचा वापर केल्याने ब्रँड चोरल्याचा आरोप होतोय
–भारताला, कोल्हापुरला श्रेय न दिल्याने व्यावसायिकांकडून आश्चर्य, आणि संताप व्यक्त

दरम्यान Prada या लक्झरी ब्रँडने सादर केलेली चप्पल खरच कोल्हापुरी आहे का ? याचे संशोधन करणे गरजेचे असल्याचे कोल्हापुरातील कारागिरांचे म्हणणे आहे. कोल्हापुरी चपलांना GI टॅग मिळालेला आहे. असं असताना Prada या लक्झरी ब्रँडने सादर केलेले कोल्हापुरी चप्पल नेमकं कुठे बनवले? त्याची कारागिरी कोणी केली ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

महाराष्ट्रातील कोल्हापूरी चप्पल ही फक्त चप्पल नाहि तर याला समृद्ध इतिहास आहे…आता त्यात Prada सारख्या ब्रँडने कोल्हापुरी चप्पलांचा डिझाईन वापरून एक लक्झरी प्रॉडक्ट तयार केलं आहे, हे कौतुकास्पद असले तरी अनेकांनी हा भारतीय डिझाईनची ”” कॉपी”” असल्याची टीका केली आहे. खरंतर पारंपरिक उत्पादनांना त्यांचे श्रेय देणे गरजेचे आहे, पण Prada या लक्झरी ब्रँडने स्वतःच्या ब्रँडिंग साठी कोल्हापुरी चपलाचा केलेला वापर अनेकांना खटकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *