30 वर्षीय पत्नीचे 55 वर्षीय प्रियकराशी अनैतिक संबंध, नवऱ्याने रंगेहाथ पकडून दोघांना संपवलं, पुण्यात तळवडे IT पार्क हादरला

पुण्यातील तळवडे आयटी पार्क परिसरातील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत बुधवारी सकाळीच्या सुमारास एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधातून पतीनेच पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. पुण्यातच जुन्नर येथील तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी असा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.

मंगला सुरज टेंभरे, वय 30 वर्ष, रा. अमरावती, आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे, वय 55 वर्ष, रा. अकोला, अशी खून झालेल्या दोघा जणांची नावे आहेत. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तसेच प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *