आज(१७ जून) सकाळी मुंबईतील गोरेगाव परिसरात बेस्ट बस आणि पिकअप ट्रकची धडक झाल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. आरे कॉलनी रोडवर गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली. सदर अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या धडकेत अनेक बस प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातानंतर आपत्कालीन सेवांना तात्काळ सूचना देण्यात आल्या आणि जखमींना मदत करण्यासाठी तसेच वर्दळीच्या मार्गावर सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
अपघाताचे कारण शोधण्यासाठी आरे पोलिस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्राथमिक अहवालांनुसार, बेस्ट बस आणि पिकअप ट्रकच्या धडकेमुळे परिसरातील वाहतूक काही काळाकरिता विस्कळीत झाली. ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांना विलंब झाला.
द्यापपर्यंत कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी, अधिकारी संबंधितांच्या वैद्यकीय स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले.
दुसरीकडे, कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलंय. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. तेव्हापासून अनेक विमानांचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात येत आहे. आता इंडिगोच्या विमानाचे देखील इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलीये. हे विमान कोचीहून दिल्लीला निघाले असताना विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यानंतर नागपूर विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले.
विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करून लगेचच प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी केली जात आहे. खरोखरच विमानात बॉम्ब ठेवण्यात आलाय का? की हि निव्वळ अफवा होती याची तसापणी सध्या सुरू आहे. या धमकीकडे जास्त गांर्भीयाने बघण्यासाठीचे महत्वाचे कारण म्हणजे धमकी देणाऱ्याने याच विमानाचा बरोबर नंबर नमूद केला होता.