सोशल मीडियाचा वाढता वापर, फेक अकाउंट्सची निर्मिती आणि त्यातून होणारी फसवणूक आता थेट जीवघेण्या थराला पोहोचली आहे. पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एका तरुणाने आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना १५ जून रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित नामदेव ढमाले (वय २२ ते २५, अंदाजे) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र सूरज सूर्यवंशी यानेच त्याचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्यांच्या तिसऱ्या मित्राने दीपक सुखदेव बंडगर (वय २३) यांनी तक्रार दिली आहे.
असताना सूरजला वाटत होते की तो दीपकच्या बहिणीसोबत बोलत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज याला संशय होता की कोणीतरी त्याची फसवणूक करत आहे, मात्र प्रत्यक्ष रोहितच असा प्रकार करेल याचा त्याला संशय नव्हता. हे समजल्यावर त्याचा राग अनावर झाला आणि त्यातूनच खून केल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकाराचा जाब विचारण्यासाठी सूरज रोहितला भेटला. त्यादोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि वाद इतका विकोपाला गेला की सूरजने जवळच पडलेल्या मोठ्या दगडाने रोहितच्या डोक्यात घाव घालून त्याचा जागीच खून केला. या प्रकारानंतर सूरज तिथून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.