गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना  घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं आहे. एअर इंडियाचं  ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.38 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून 10 क्रू मेंबरांसह तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे, घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.

एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 विमान

अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी ह्या विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला. अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात विमानाचा अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे, येथेच हा अपघात झाला आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. अपघातात मोठी जवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान कोसळलं असून या विमानातील प्रवासी क्षमता 300 एवढी आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे. या विमानात 10 क्रू मेंबर्स आणि 242 प्रवासी प्रवास करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *