आयुष्य उद्ध्वस्त करेन! जीव घेण्याची धमकी, पुण्यातील PIवर गंभीर आरोप; पत्र लिहून हवालदार गायब

पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत. केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून, या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.

मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत लिहिलेल आहे. मात्र, या संदर्भात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रसार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *