स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू व बलात्काराच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या आसाराम बापू यांचे सेक्सचे धडे देणारे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचले, याची चौकशी करण्याचे आदेश छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील कोंडागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांनी आसाराम बापूंचे पुस्तक देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणून विद्यार्थ्यांना बळजबरी हे पुस्तक वाचण्याचे सांगण्यात आले होते. याविषयी बोलताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे.
‘दिव्य प्रेरणा-प्रकाश‘ असे नाव असलेल्या या पुस्तकात सेक्सविषयी धडे देण्यात आले आहेत.

