RCB प्रकरणाचा पुणेकरांनाही फटका; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

इंडियन प्रिमिअर लीगमध्ये पहिलं जेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला अच्छे दिनऐवजी बुरे दिन सुरु झाले आहेत की काय अशा घडामोडी घडत आहेत. 3 जून रोजी ऐतिहासिक विजय मिळवत 18 वर्षांनी पहिल्यांदाच आयपीएल चषक उंचावल्यानंतर बंगळुरुचा संघ सेलिब्रेशनसाठी बंगळुरुमधील चेन्नस्वामी स्टेडियममध्ये पोहचला. मात्र या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी एवढी गर्दी केली की तिथे चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात असतानाच आता आरसीबीच्या विजयानंतरचं सेलिब्रेशन काही पुणेकरांनाही महागात पडलं आहे.

बंगळुरुमध्ये कारवाई अन् पुणे पोलीसही अॅक्शन मोडमध्ये

एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) फ्रँचायझी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (केएससीए) आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांसह आफआयआर दाखल केला आहे. तर दुसरीकडे आरसीबीच्या विजयानंतर 4 जूनच्या मध्यरात्री पुण्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधातही पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *