नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले, पहाटे कारची धडक; दोघांचा तो प्रवास शेवटचा ठरला, पती-पत्नीची कायमची ताटातूट

कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला असून कर्त्या पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परतूरकडे जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पडेगाव रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले, पण काळाचा घाला

मकसूद मिर्झा बेग, वय ६५ वर्ष, असं अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर शमिना बेग या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकसूद बेग हे कुटुंबासह कादंबरी दर्गा परिसरामध्ये राहतात. दरम्यान गुरुवार दिनांक ५ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास परतुर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी बेग पती-पत्नीला जायचं होतं. परतूरला जाण्यासाठी दुचाकी रेल्वे स्थानकावर पार्किंगमध्ये उभी करून ते पुढे रेल्वेने जाणार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *