कारचा प्रचंड वेग आणि वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा ताबा सुटला

कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे मंगळवारी रात्री उशीरा एक हृदयद्रावक अपघात घडला. नाशिकहून सटाण्याकडे जात असलेली ग्रँड आय 10 कार भरधाव वेगाने जाऊन कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडकली. या अपघातात नामपूर येथील भदाणे कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. कारचा वेग प्रचंड होता आणि वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा ताबा सुटल्यामुळे कार थेट विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या संरक्षक बीमवर आदळली. या भीषण अपघातात गाडीचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. “कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे,” असे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *