मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने बुधवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान तडे गेल्याचे निदर्शनास आले.
ऐन गर्दीच्या वेळेतच वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावार जाणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याचे रेल्वे अधिका-यांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

