मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला 14 वर्षांची सक्तमजुरी अन्…

आर्थिक स्थिती बिकट असलेल्या आणि 10 वीत शिकणाऱ्या मुलींना वैश्या व्यवसायात ढकलून त्यांच्या माध्यमातून रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी पिटा कायद्यानुसार दोषी ठरवले आहे. त्यासोबतच 14 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देखील सुनवण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण 2014 मध्ये घडले होते.

समाजसेवा शाखेला गोरेगावातील आरे कॉलनीत महिला मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार समाजसेवा शाखेने आक्रमक पवित्रा घेत कट रचला. ज्यामध्ये शाखेने बोगस ग्राहक वैश्या व्यवसाय सुरु असणाऱ्या ठिकाणी पाठवले. तिथे गेल्यानंतर वैश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेने मुलींसाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर बोगस ग्राहकाने महिलेला पैसे देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर ती महिला साउथ कोस्ट हॉटेलमध्ये दोन मुलींना घेऊन आली असता तिला ताब्यात घेण्यात आले.

पुराव्यामुळे महिला दोषी 

ताब्यात घेतल्यानंतर महिलेवर खटला चालवण्यात आला. हा खटला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष पोक्सो न्यायाधीश डी.एस. देशमुख यांच्या न्यायालयात सुरु होता. यामध्ये सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी केलेल्या युक्तिवादात या शाळकरी मुलींच्या गरिबीचा फायदा घेत या महिलेने हा वैश्या व्यवसाय करत असल्याचे मान्य केले. त्यासोबतच हा संपूर्ण प्रकार समोर आणण्यासाठी बोगस ग्राहक आणि परिस्थितीजन्य पुरावे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर ठेवण्यात आले.

या संपूर्ण पुराव्याची पडताळणी करता न्यायाधीश डी. एस देशमुख यांनी महिला दलालास दोषी ठरवले. त्यानंतर शुक्रवारी न्यायाधीश डी. एस देशमुख यांनी त्या महिलेला 14 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यासोबतच त्या महिलेला 10 हजार रुपयांचा दंड देखील सुनावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *