भारतातील ‘ती’ एक सवय महिलेला पडली महगात, परदेशात कोर्टाने ठोठावला तब्बल 80 हजारांचा दंड

भारतातील एक सवय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेला चांगलेच महागात पडले आहे. भारतात कबुतरांना दाणे खायला घालण्यामागे भूतदयाबरोबरच धार्मिक कारणदेखील सांगितले जाते. मात्र कबुतरांच्या विष्ठेमुळं श्वसनाचे आजार जडतात. त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी त्यांना खाणे देऊ नये अशा सूचना वारंवार केल्या जातात. तरीही भारतात अद्यापही हा नियम काटेकोरपणे पाळला जात नाही. मुंबई महापालिकेने तर त्यासाठी नवी नियमावली करून 500 रुपये दंडाची तरतूदही तरतूदही केली आहे. मात्र हीच सवय एका भारतीय वंशाच्या महिलेला चांगलीच महागात पडली आहे.

हीच सवय सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या ज्येष्ठ महिलेला महागात पडली आहे. वारंवार समज देऊनही कबुतरांना खाऊ घातल्याप्रकरणी सिंगापूरमधील न्यायालयाने या 70 वर्षीय महिलेला 1200 सिंगापूर डॉलरचा (सुमारे 80 हजार रुपये) दंड दंड ठोठावला आहे. षण्मुगानंदन शामला या सिंगापूरच्या लोरोंग तोआ पायो भागात राहतात. त्या कबुतरांना कायम धान्य-दाणे खायला देत असत. 11 एप्रिल, 2023 रोजी त्यांची ही कृती राष्ट्रीय उद्यान मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.

अधिकाऱ्यांनी शामला यांना समज दिली. तसेच कबुतरांना खाऊ घालण्याच्या या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात, याची कल्पनाही दिली. मात्र, तरीही नोव्हेंबर, २०२४पर्यंत शामला यांनी असंख्य वेळा कबुतरांना खाऊ घातले. १९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उद्यान मंडळाचे अधिकारी शामला यांच्या घराजवळ कबुतरांना पकडण्यासाठी आले असता त्यांना शामला यांनी हटकले तसेच कर्तव्यापासून रोखले. अखेरीस शामला यांच्यावर वन्यप्राणी कायद्याचा भंग तसेच सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

न्यायालयाने शामला यांचे वर्णन हट्टी गुन्हेगार असे केले. तसेच त्यांचे वय लक्षात घेता सौम्य शिक्षा देण्यात येईल, असेही स्पष्ट केले. शामला यांनी दंड न भरल्यास दोन दिवसाचा तुरुंगवास सहन करावा लागेल, असे न्यायालयाने सांगितले. त्यावर शामला यांनी 1200 डॉलरचा दंड भरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *