मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी, पहिली गुणवत्ता यादी कधी? जाणून घ्या!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे आता विद्यार्थ्यांना २६ मे पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च,  ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission  या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.

बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असून आतापर्यंत २,२५,५५६ एवढी नोंदणी झाली असून, १,४५,०८७ एवढ्या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ५,०९,५७८ एवढे अर्ज सादर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *