वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेटमधून अटक केली आहे. गेल्या सात दिवसांपासून दोन्ही बापलेक फरार होते. अशातच दोघांना अटक करण्यात आली असून आता कस्पटे कुटूंबियांनी न्यायाची मागणी केली आहे. अशातच पाच दिवसानंतर कस्पटे कुटूंबियांना वैष्णवीचं 9 दिवसांचं बाळ मिळालं आहे. हगवणे कुटूंबियांनी बाळ देण्यास नकार दिला अन् बाळाला अज्ञात स्थळी ठेवलं होतं. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बाळाच्या कमरेवर गाठ
कस्पटे कुटूंबियांना संशय येताच वैष्णवीच्या बाळाला वैद्यकीय तपासण्यासाठी नेण्यात आलं आहे. वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाच्या कमरेवर गाठ आलीय. त्यामुळे कदाचित दोन-तीन दिवस झोपेच इंजेक्शन दिलं असावं, असा संशय कस्पटे कुटूंबियांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता नराधमांनी क्रूरतेचा कळस गाठला अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.
वैष्णवीचं बाळ तीन-चार जणांच्या हातून कसपटे कुटुंबाकडं आलं आहे. सुरुवातीला ते निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडं होतं.
निलेश चव्हाण हा आमच्या घरातील भांडणामध्ये कायम आलेला आहे. निलेश शशांक हगवणेचा मित्र नाही तर करिश्मा हगवणेचा मित्र आहे. आमच्या मिटिंग सुद्धा त्याच्या ऑफिसलाच झालेल्या आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन झाले. डॉ.जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
वैष्णवीची हत्या की आत्महत्या?
वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईंकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या हत्येच्या दिशेने तपास करावा, अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे.
स्वारगेटमधून अटक
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक स्वारगेटमध्ये करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे हुंडा बळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशातच आता मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून बावधन पोलिसांनी कारवाई केली आहे.