नवज्योत सिंग सिद्धू रुग्णालयात

नवज्योत सिंग सिद्धू रुग्णालयात

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सिद्धूला न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सिद्धू अमृतसर येथील खासदार आहेत. सिद्धू यांना डीप वेन थ्रोम्बोसिस आजार असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान सिद्धू यांनी ट्विटरवर तब्येत खराब असल्याचे सांगत देवाच्या दयेने लवकरच बरा होईल असे म्हटले आहे. तसेच सिद्धूने त्यांच्यासाठी सर्वांना प्रार्थना करण्याचे आवाहन ट्विटरवर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *