मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार; उंच डेक बांधण्याची योजना, काय होणार बदल?

मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर हे सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक आहे. आता या स्थानकाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मस्जिद बंदर स्टेशन आता असलेल्या ठिकाणाहून एक मजला वर केलं जाणार आहे. रेल्वेने मस्जिद बंदर स्टेशनवरील सर्व प्लॅटफॉर्म वर घेऊन एक उंच डेक बांधण्याची योजना आखली आहे. यासाठी ९.१४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सर्व प्लॅटफॉर्मवर उंच एलिव्हेटेड डेक उभारला जाणार –

रेल्वेने मस्जिद बंदर स्टेशनवरील सर्व प्लॅटफॉर्मवर एक उंच डेक बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. मस्जिद बंदर स्टेशन प्रमुख व्यावसायिक ठिकाणांपैकी एक असल्याने या स्टेशवर, तसंच आजूबाजूच्या भागात आठवड्याच्या दिवसात मोठी गर्दी असते. अर्थसंकल्पानुसार, मस्जिद बंदर स्थानकात एस्केलेटर आणि लिफ्टसह एलिव्हेटेड डेक बांधण्यासाठी ९.१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मस्जिद बंदर हे सर्वात जुन्या स्थानकांपैकी एक असून ते २० सप्टेंबर १८७५ रोजी हे स्थानक सुरू करण्यात आलं होतं. मस्जिद बंदर हे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक आहे. त्याशिवाय हा भाग विविध व्यवसायांसाठी मध्यस्थानी असलेलं क्षेत्र आहे. अशा सतत अतिशय गर्दी असलेल्या वर्दळीच्या ठिकाणावरुन प्रवास करताना मस्जिद बंदर स्थानकात मोठी गर्दी होताना दिसते.

इतक्या मोठ्या गर्दीसाठी हे स्टेशन अतिशय अरुंद ठरतं आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म अरुंद असल्याने सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. अनेकदा एकाच वेळी दोन्ही बाजूने ट्रेन आल्यास चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती दिसते. या मस्जिद बंदर पुलाला अनेक पूल जोडले गेले आहेत. मात्र तरीही स्थानकात मुख्य समस्या अरुंद छप्पर नसलेल्या प्लॅटफॉर्म्ससह, निमुळते जिने असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *