हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आली आहे. तिरंगा रॅली सुरू असताना तानाजी मुटकुळे जमिनीवर कोसळले. यानंतर एकच गोंधळ उडाला. यादरम्यान कार्यकर्त्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता कार्यकर्त्यांनी आमदार मुटकुळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तानाजी मुटकुळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
तानाजी मुटकुळे यांना चक्कर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्यांना खाली आणले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. काही कार्यकर्त्ये त्यांना वारे घालताना देखील दिसत आहेत. यावेळी पोलिस कर्मचारी देखील तानाजी मुटकुळे यांना खाली घेऊन जाण्यासाठी मदत करताना दिसतोय. खाली उभ्या असलेल्या गाडीमध्ये टाकून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिरंगा रॅली सुरू असतानाच ही घटना घडली. सध्या तानाजी मुटकुळे यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती येतंय.