मोबाईलवर बोलत थांबलेल्या एका शिक्षकावर काळाने घाला घातला आहे. मोबाईलवर बोलत असताना अंगावर वीज पडल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली आहे. जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गुरुवारी (15 मे) दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. संजय कृष्णकुमार पांडे (वय ५६) (रा. करंजी ता. माहूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. गुरुवारी देखील माहूरमध्ये अवकाळी पाऊस बरसला. संजय पांडे हे दुपारी साडे तीन वाजताच्या माहुरमध्ये दुचाकीवरून गावाकडे जात होते. दरम्यान, फोन आल्याने ते रस्त्यातच फोनवर बोलत थांबले होते. यावेळी अचानक अंगावर वीज पडली आणि त्यांचा मृत्यू झाला.