नोटाबंदीनंतरच्या सोन्याच्या खरेदीशी संबंधित, ८४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणातून पुष्पक बुलियनचे संचालक चंद्रकांत पटेल आणि आणखी पाच जणांना विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषमुक्त केले.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांची सुनावणी करणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय डागा यांनी पटेल आणि इतर आरोपींना या प्रकरणातून दोषमुक्त केले. या प्रकरणी दाखल केलेला मूळ गुन्हा रद्द झाला आहे. त्यामुळे, त्या गुन्ह्याच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा कायम राहू शकत नाही, असे न्यायालयाने पटेल यांच्यासह अन्य आरोपींना दिलासा देताना नमूद केले.