पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बुधवारी शिवनेरी बस आणि एका खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ९ जण जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जखमींपैकी तिघेजण गंभीर जखमी आहेत. खालापूरजवळ हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणा-या शिवनेरी बसचालकाचा खालापूरजवळच्या उतारावर बसवरील ताबा सुटला. त्यामुळे शिवनेरी बस आपला मार्ग ओलांडून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर जाऊन कर्नाटक मधील एका बसला समोरून धडकली.
या भीषण अपघातामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

