अतिशय धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही महिलांचा ग्रुप लोकल ट्रेनच्या फुटपाथवरुन प्रवास करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. Mumbai Railway नावाच्या अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आलाय.
लोकल बाहेर लटकताना
व्हिडिओमध्ये, महिला बाहेर लटकलेल्या फूटबोर्डवर उभ्या असताना ट्रेनला धरून होत्या. त्यापैकी एक ओरडतानाही ऐकू येत होती. दुसऱ्या महिलेने हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. पोस्टनुसार, कल्याण लेडीज स्पेशल ४० मिनिटे उशिराने धावली, ज्यामुळे महिलांना असा प्रवास करावा लागला.
या व्हिडीओवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने या प्रवासाला जीवघेणा प्रवास म्हटलं आहे. अनेकांना हे ट्विट रेल्वे मंत्र्यांना टॅग करुन विनंती देखील केली आहे. लोकलचा प्रवास हा नेहमीचा असला तरीही जीवघेणा आहे.
एका ट्विटमध्ये असे लिहिले होते, “सर्व गाड्यांच्या उशिरामुळे प्रत्येक मुंबईकराला या गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागते.” दुसऱ्या व्यक्तीने विचारले, “जर लोकल गाड्या जास्त भरत असतील तर हे असंच होणार. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही रेल्वे आणि @grpmumbai ची जबाबदारी आहे. हे नेहमीच दुर्लक्षित केले गेले आहे. आणि आता बदलण्याची वेळ आली आहे.”
एका ट्विटमध्ये असे लिहिले होते, “आजकाल दररोज लोकल गाड्या उशिराने धावत आहेत आणि सोशल मीडियावर विचारल्यानंतर त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळत नाही?” एका व्यक्तीने ट्विट केले होते, “हा फक्त विलंब नाही, हा रोजचाच प्रकार आहे.”
