हळदीच्या कार्यक्रमातून घरी जाताना बाईक दुभाजकाला धडकली अन्… दोन कुटुंबांनी आधार गमावला

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पालघरच्या सकवार परिसरात हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. एकाचा हळद समारंभ आटोपून हे दोघे घरी परतत होते. तेव्हा वाटेतच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि ते घरी पोहोचू शकले नाही. अशोक दत्तू खांडवा (वय 25) आणि पारस सुनील वरठा (वय 18) अशी या अपघातातील मृत दोन्ही तरुणांची नावं असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी शेजारी असलेल्या दोन कुटुंबाने आपली मुलं गमावल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घरी परतत असताना दुचाकीला अपघात

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हालोली- बोट परिसरात एका लग्न समारंभात अशोक हांडवा आणि पारस वरठा हे दोघे तरुण आणि त्यांच्यासोबत आणखी काहीजण सहभागी होण्यासाठी गेले होते. हे सर्व दुचाकीने कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. लग्न- हळद समारंभ आटोपून ते पुन्हा दुचाकीवरून आपल्या घराच्या दिशेने निघा
वाटेत मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार नजीक एका काँक्रीटच्या दुभाजकाला त्यांची दुचाकी धडकली आणि भीषण अपघात घडला. शनिवारी (10 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात दोन्ही तरुण गंभीररित्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *