‘तुला शेवटचं सांगतो, थांबव हे सगळं’; पतीची शेवटची सूचना, पत्नीला प्रियकरावाचून करमेना, अखेर नको तेच घडलं, अन् कुटुंब उध्वस्त झालं

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने वारंवार बोलूनही कसलीच सुधारणा न झाल्याने राहत्या घरी गळफास घेऊन पतीने जिवन संपविल्याची घटना २९ एप्रिल रोजी घडली होती. आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पत्नीसह, प्रियकरावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बारीकनाथ शेंडगे वय वर्ष ३८ रा.कासारी ता.आष्टी असे मृताचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील कासारी येथील गणेश बारीकनाथ शेंडगे याच्या पत्नीचे गावापासून जवळच असलेल्या केळसांगवी येथील एका माणसासोबत दोन वर्षांपासून सुत जुळले होते. याची कुणकुण पतीला लागल्याने त्याने तिला समजून सांगितले. तरी देखील तिच्या वर्तनात कसलीच सुधारणा न झाल्याने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून २९ एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान गणेशने राहत्या घरी गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना घडली होती.

४ मे रोजी मयताचा भाऊ दशरथ बारीकनाथ शेंडगे याच्या फिर्यादीवरून गणेशची पत्नी श्रृतुजा गणेश शेंडगे, प्रियकर अक्षय महादेव पडोळे रा.केळसांगवी ता.आष्टी यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कलम १०८,३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे करीत आहेत. मयताच्या पाश्चात दोन मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *