एमबीबीएसची विद्यार्थिनी दोन वर्ष लहान डिलिव्हरी बॉयच्या प्रेमात, कुटुंबाने तंबी दिली तरी संबंध सुरुच, अखेर…

प्रेमप्रकरणातून एका १९ वर्षिय मुलाचे अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली. कर्नाटकमधील बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील देवनहल्ली पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात हि भयंकर घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव प्रीतम (१९) असे आहे. तो नीरगुंटेपल्या गावातील रहिवासी होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रीतम डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीवर प्रेम करत होता. ती मुलगी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

मुलीच्या कुटुंबीयांनी प्रीतमला प्रेमसंबंधाबद्दल इशारा दिला होता. इशारा देऊनही, प्रीतमचे त्या मुलीशी प्रेमसंबंध सुरूच होते. शुक्रवारी(२ मे) रात्री प्रीतमचे अपहरण करून हत्या करण्यात आली. मुलीच्या मावशीचा मुलगा श्रीकांत आणि त्याच्या साथीदारांनी प्रीतमचे अपहरण केल्याचा आरोप आहे. यानंतर ४-५ मद्यधुंद लोकांनी त्याच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. प्रीतमच्या मृत्यूनंतर, आरोपी मृतदेह तसाच टाकून पळून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *