लॉजवर राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा, अशा सूचना पुणे पोलिसांनी लॉज मालक आणि चालकांना दिल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहेत.
लॉजवर राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा, अशी सूचना पुणे पोलिसांनी लॉजचे मालक-चालक यांना केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली.
पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि लॉज मालक- चालक यांच्यात बैठक झाली. पुणे पोलिसांच्या परिमंडळ 5 कडून हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक झाली. लॉज येथे राहावयास येणारे परदेशी नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
