जयपुरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना तुफान रंगला. याला कारण ठरवा अवघ्या 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी.
गुजरात टायटंस विरोधातील सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक ठोकत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरातने 211 धावांचं आव्हान दिल्यानंतर यशस्वी जैसवालसह वैभव सूर्यवंशी फलंदाजीला उतरला होता. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या वैभवने 17 चेंडूत अर्धशतक आणि 35 चेंडूत शतक ठोकत संपूर्ण क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. दमदार खेळी दाखवल्यानंतर वैभव सूर्यवंशी 37 चेंडूत 110 धावा करुन बाद झाला. वैभव बाद झाल्यानंतर चाहत्यांनी देखील टाळ्यांचा गडगडाट करत कौतुक केलं.
