“मंकी हिल पॉईंटला गुलाबी सुटकेस पडलेय”, ट्रेनमधून प्रवाशाचा फोन, पोलिसांनी बघताच… लोणावळ्यात खळबळ

लोणावळ्याजवळील मंकी हिल परिसरात मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रुळाजवळ गुलाबी रंगाच्या Suitcase मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, लोणावळा पोलिस आणि रेल्वे पोलिस सखोल तपास करत आहेत.

लोणावळा रेल्वे पोलिसांनी मृतदेह Post Mortem साठी पाठवला असून, Suitcaseआणि आजूबाजूच्या परिसरातील पुरावे तपासले जात आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून, आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने हत्येचा संशय अधिक बळावला आहे. मात्र, Post Mortem अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे लोणावळा आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांमध्ये गुलाबी Suitcase आणि या रहस्यमय मृत्यूची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता कुठलीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. लोणावळा पोलिस आणि रेल्वे पोलिस या प्रकरणाला प्राधान्य देत तपास करत असून, लवकरच या घटनेचा उलगडा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *