तप्त झळांमुळे राज्यात फळे, भाजीपाला करपला

राज्यात बहुतेक भागात पारा ४० अंशांवर गेल्याने तप्त झळांमुळे फळे, भाजीपाला आणि नव्याने लागवड झालेल्या रोपांची होरपळ सुरू आहे. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडीसह पालेभाज्या उन्हामुळे करपत आहेत. उन्हाळी पावसाने दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुबार, धुळ्यात तीव्र उन्हामुळे पपईची झाडे आणि फळे करपली आहेत. जळगाव जिल्ह्यात केळीची पाने करपली. अनेक ठिकाणी केळींवर काळे डाग पडले आहेत. ऊन्हामुळे केळींची झाडे कमकुवत बनत आहेत. रात्रीच्या वाऱ्याने ही झाडे कोलमडून पडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *