पुण्यात ट्रेनिंगसाठी आलेल्या एका तरुणीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ट्रेनिंगसाठी पुण्यात आलेल्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्याशिवाय तिच्याकडून २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी कबीर अहमद खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
प्रकरण काय?
प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात प्रशिक्षणासाठी आली होती. या काळात आरोपी कबीर अहमद खान याने तिच्याशी संपर्क साधला. आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले. तरुणीला धमक्या देऊन तिच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. असेच काही दिवस गेले. अखेर पीडित तरुणीने हिम्मत दाखवत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गंभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाई करत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
७ ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत तरुणीवर अत्याचार केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला पुणे, मुंबई, नेपाळ, थायलंड, सांताक्रूझ येथे नेत तिच्या अत्याचार करण्यात आले. तिला विविध कारणं देत तिच्याकडून २५ लाख रुपये उकळले. तसंच आरोपीने तरुणीला तिचे पैसे परत करण्याचं सांगितलं होतं, मात्र तरुणाने टाळाटाळ केल्यानंतर याप्रकरणी तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
![]()
विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
