मुंबईसह राज्यात बाईक टॅक्सीला मंजुरी; कसे असेल भाडे आणि नियम, जाणून घ्या!

महाराष्ट्राच ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ई-बाईक टॅक्सी म्हणजे काय? तसंच, याचे भाडे किती असणार, हे सर्व जाणून घेऊया.

महाराष्ट्रात लवकरच ई-बाईक टॅक्सी उपक्रम राबवण्यात येणार आहे. सध्या रिक्षा-टॅक्सीसाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडं द्यावे लागते. त्यामुळं आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची गैरसौय दूर होणार आहे.  एकटा प्रवासी ई-टॅक्सीच्या माध्यमातून जवळपास 15 किमीपर्यंतचा प्रवास करू शकणार आहे. ई-बाईक टॅक्सीमध्ये दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्या ई-बाईकला परवानगी देण्यात येणार आहे. ई-बाईक टॅक्सी ही लोकल ट्रेन, मेट्रो, बेस्ट बस, टॅक्सी आणि रिक्षाला पर्याय असणार आहे.

दरम्यान, ई-बाईक टॅक्सीसाठी प्रवासी भाड्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. प्रवासी भाड्यासंदर्भातील नियमावली सरकारकडून तयार करण्यात येणार आहे. रिक्षात ज्या प्रवासासाठी 100 रुपये लागतात त्याच प्रवासासाठी ई-बाईक टॅक्सीमध्ये 30 ते 40 रुपयांत कसा होईल याचा विचार केला जाणार आहे. येत्या एक ते दोन महिन्यात ई-टॅक्सी बाईक सुरू होणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

बाईक टॅक्सीचे नियम काय?

फक्त इलेक्ट्रीक बाईक्सलाच परवानगी असेल

ईलेक्ट्रीक बाईकचा रंग पिवळा असेल

बाईकसाठी GPS बंधनकारक असणार

चालक आणि प्रवाशांसाठी इन्सुरन्सची तरतूद करण्यात येईल

चालकाची पार्श्वभूमी तपासण्यात येईल

महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली बनवणार

50 बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे.

ई-बाईकचे फायदे

तरुण-तरुणींना रोजगार मिळणार
हवेतील प्रदूषण कमी होणार
वाहतूक कोंडीतून सुटका
पार्किंगसाठी कमी जागा लागणार
प्रवास सुखकर होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *