इथं माणुसकीच जिंकली; निराधार हिंदू भावाला मुस्लीम- ख्रिस्त बांधवांनी दिला अग्नी

दुःखाच्या प्रसंगी उपयोगी ठरतो तोच खरा धर्म. माणुसकी धर्माचं अनोख दर्शन पुण्यात घडलं. रास्ता पेठेत राहणाऱ्या एका महिलेच्या भावाचं बुधवारी सायंकाळी निधन झालं. महिलेला इतर कोणी नातेवाईक नाहीत. अशा वेळी तिच्या मदतीला धावून आलेल्यांपैकी एक होता ख्रिश्चन तर दुसरा मुस्लिम.

शेजारी राहणारे मायकेल साठे आणि त्यांचा मित्र जावेद खान यांनी महिलेच्या भावाचं पार्थिव ससून रुग्णालयात नेलं. शिवविच्छेदनासाठी तिथेच रात्रभर थांबावं लागेल. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महिलेच्या इच्छेनुसार हिंदूधर्म परंपरेप्रमाणे पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्माने ख्रिश्चन असलेले मायकेल साठे आणि मुस्लिम असलेले जावेद खान यांनी स्वतः अंत्यविधी मध्ये सहभागी होत माणुसकी धर्म दाखवत महिलेची मदत केली.

सध्या ख्रिश्चनांमध्ये लेंटचे 40 दिवसांचे उपवास सुरू आहेत. तर मुस्लिमांचे रोजे सुरू आहेत. अशा पवित्र काळात हिंदू महिलेला दोन विभिन्न धर्माचे भाऊ मिळाले. ज्यांनी माणुसकी धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *