ऑफिसमध्ये महिलांनी ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीत करायचा लघवी, वॉचमनचं किळसवाणं कृत्य आलं समोर

अमेरिकेच्या टेक्सास येथील एका ऑफिसमध्ये एका व्यक्तीने केलेल्या किळसवाणा प्रकार जाणून तुम्हाला धक्का बसेल. लुसियो कॅटरिनो डियाज नावाच्या व्यक्तीला ऑफिसमधील महिलांच्या पाण्याच्या बाटलीत लघवी करताना रंगेहात पकडण्यात आले. कोर्टाने याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली यावेळी आरोपीने तो हे किळसवाणं कृत्य का करायचा याबाबत सुद्धा सांगितलं आहे. ज्यावेळी याच कारण समोर आलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

इंडिपेंडेंटने दिलेल्या रिपोर्टनुसार ही धक्कादायक घटना ऑगस्ट 2022 मध्ये घडली. लुसियो ह्यूस्टन हा मेडिकल फॅसिलिटीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होता. तेथे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला पिण्याच्या पाण्याच्या डिस्पेंसरमधून एक वेगळाच दुर्गंध आणि चव येत असल्याचे जाणवले. त्यानंतर ती स्वतःची पाण्याची बॉटल आणू लागली, मात्र काही दिवसांनी तसाच दुर्गंध त्या बॉटलमधून सुद्धा येऊ लागला. ऑफिसमध्ये कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे महिलेने या घटनेचा छडा लावण्यासाठी स्वतः एक छोटा कॅमेरा आणून तो ऑफिसमध्ये एका छुप्या ठिकाणी लावला. त्यानंतर कॅमेऱ्यामध्ये जे रेकॉर्ड झालं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *