मुंबईकरांनो, उद्या वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द?

माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०

परिणाम : ब्लॉक वेळेत अप आणि डाउन मार्गावरील जलद लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे
स्थानक : कुर्ला ते वाशी
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : सकाळी ११.१० ते सायं ४.१०

पश्चिम रेल्वे
स्थानक : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *