महाराणा प्रताप यांतं वंशज आणि मेवाड राजघराण्याचे एक प्रमुख सदस्य अरविंद सिंह मेवाड यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं. ते बऱ्याच काळापासून आजारी होतं आणि उदयपूरमधील सिटी पॅलेसमधील शंभू निवास इथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने मेवाडमध्ये शोककळा पसरली आहे. अरविंद सिंह मेवार यांच्या पार्थिवावर 17 मार्च रोजी सकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार सुरू होतील. अरविंद सिंह मेवाड यांची अंत्ययात्रा शंभू निवास येथून बडी पोल, जगदीश चौक, घंटाघर, बडा बाजार, दिल्ली गेट मार्गे महासतियापर्यंत जाणार आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून दोन्ही भावांमध्ये 50000 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून वाद सुरु आहे.
13 डिसेंबर 1944 रोजी उदयपूर इथे सिटी पॅलेस इथे जन्मलेले अरविंद सिंह मेवाड हे महाराणा प्रताप यांचं वंशज होते. त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा समृद्ध वारसा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी केवळ सिटी पॅलेसच्या जतन आणि विस्तारात योगदान दिले नाही तर मेवाडची संस्कृती आणि परंपरा देखील जिवंत ठेवल्या होत्या. अरविंद सिंह मेवाड यांच्या निधनानंतर मेवाडच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अरविंद सिंह मेवाड यांच्या मृत्युनंतर, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की मेवाडच्या वारसा आणि मालमत्तांचे भविष्य काय असेल? राजघराण्यात मालमत्तेचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्याकडे सुमारे 50.000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. आता त्याचे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
भावाच्या निधनानंतर मेवाड राजघराण्यातील वाद वाढत गेला. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचा मोठा भाऊ महेंद्रसिंग मेवाड यांचं निधन झालं. यानंतर, राजघराण्यातील मालमत्तेचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. राज्याभिषेक समारंभात, जेव्हा महेंद्रसिंग मेवाड यांचा मुलगा धुनी दर्शनासाठी सिटी पॅलेसमध्ये पोहोचला तेव्हा दरवाजे बंद करण्यात आले, ज्यामुळे वाद आणखी वाढला.
मेवाडचा वारसा आणि मालमत्तेचा वाद माजी महाराणा भगवंत सिंह मेवाड यांनी 1963 ते 1983 दरम्यान राजघराण्याच्या अनेक मालमत्ता भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या. या निर्णयामुळे संतापलेल्या मोठ्या मुलाने महेंद्र सिंगने मालमत्तेचे समान वाटप करण्याची मागणी करत न्यायालयात खटला दाखल केला. मात्र भगवंत सिंग यांनी त्यांचा धाकटा मुलगा अरविंद सिंग मेवाड याला मालमत्तेचा मालक म्हणून घोषित केलं, ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले.
त्यांच्या मृत्यूनंतर मेवाडच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अरविंद सिंह मेवाड यांच्या मृत्यूनंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की मेवाडच्या वारसा आणि मालमत्तांचे भविष्य काय असेल? राजघराण्यात वर्षानुवर्षे सुरू असलेला वाद आता कोणत्या दिशेने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
