महाराणी ताराराणींची समाधी उपेक्षित, समाधीकडं सरकारचं दुर्लक्ष

महाराणी ताराराणींची समाधी उपेक्षित असून त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जात आहे. साता-याच्या संगम माहुलीत ताराराणींची समाधी असून ती सध्या उपेक्षित आहे.  दरम्यान समाधीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने इतिहास अभ्यासक, तज्ज्ञांनी नाराजी जाहीर केली आहे.

– ताराराणी छत्रपती राजारामांच्या पत्नी
– हंबीरराव मोहितेंच्या ताराराणी कन्या
– स्वराज्य संकटात असताना मराठ्यांचं नेतृत्व केलं
– औरंगजेबाच्या आक्रमणाचा नेटानं सामना केला
– 10 डिसेंबर 1761 साली साता-यात निर्वाण
– संगम माहुलीवर ताराराणींची समाधी

“समाधीची स्थाननिश्चिती मराराणी ताराबाईंचे चरित्रकार जयसिंगराव पवार सरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती. त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्यात याचं छायाचित्र छापलं होतं. त्यानंतर ही समाधी दुर्लक्षित झाली होती. कोल्हापुरातील आम्ही शिवप्रेमी त्या ठिकाणी गेलो होतो. 2005 वा आलेल्या महापुरात समाधीवर 10 फूट वाळूचा थर साचला होता. साताऱ्यातील शिवप्रेमींच्या मदतीने आणि श्रमदान करुन आम्ही ती समाधी वाळूच्या वर आणली होती. तिथे 10-12 दगड आणि 2 शिवलिंग होते. आम्ही पवार सरांच्या पुस्तकातील छायाचित्राप्रमाणे ते रचून ठेवले होते. त्यानंतर अनेक वेळा या समाधीचा जिर्णोद्दार व्हावा म्हणून सातत्याने शिवप्रेमींनी प्रयत्न केले आहेत. येथे छत्रपती घराण्यातील अनेकांच्या समाधी आहेत. पण वारंवार प्रयत्न करुनही या समाधींचा जिर्णोद्धार का होत नाही हा माझ्यासारख्या अभ्यासकाल पडलेला प्रश्न आहे,” असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *