अभिनेत्री अदा शर्माला अपघात, रुग्णालयात दाखल

अभिनेत्री अदा शर्माला अपघात, रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माला अपघात झाला आहे. हैदराबादमध्ये एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अदाला काल अपघात झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘1920’ या सिनेमातून अदा शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं यानंतर अदाने हार्ट अटॅक तसंच एस/ओ सत्यमूर्ती या साऊथ इंडियन सिनेमात काम केलं आहे.

एका सुत्राच्या माहितीनुसार, “अदा एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बाईकवरुन पडली. या अपघातानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *