चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयी जल्लोषावेळी दोन गटात वाद, पोलीसांचा लाठीमार

भारतीय संघाने न्यझीलंडला पराभूत करुन आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या दोन गटात मिरजेत जोरदार घोषणाबाजी झाली. यातून दोन गटात वाद निर्माण झाल्याने दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.

भारताने न्यूझीलंडवर मात केल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते. याचवेळी दुसरा गट देखील त्या ठिकाणी आला. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी भारताचा विजय साजरा करणाऱ्या तरुणांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लाठीमार करत दोन्ही गटाला पांगवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *