जहागीरदार म्हणाले की, न्यायाधीशांच्या बेछूट वक्तव्यांबद्दल तक्रारी करण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही हे फार निराशाजनक आहे. “जिल्हा न्यायालयांमध्ये असं बरेच काही घडतं जे कोणत्याही तर्कशुद्ध विचारसरणीच्या सुशिक्षित व्यक्तीच्या विवेकाला धक्का देईल. दुर्दैवाने, मला वाटते की आपल्या समाजात काही अपमानजनक गोष्टींसाठी एक मूलभूत सहनशीलता आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
अशाच एका प्रकरणाची माहिती दिली. एका सत्र न्यायाधीशांनी त्यांच्या एका क्लायंटला थोडी लवचिकता दाखवण्यास सांगितल होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायाधीशांनी त्यांच्या क्लायंटला सांगितले, “जर एखादी महिला चांगली कमाई करत असेल, तर ती नेहमीच तिच्यापेक्षा जास्त कमाई करणारा पती शोधेल आणि कमी कमाई करणाऱ्या व्यक्तीवर कधीही समाधान मानणार नाही. तथापि, जर चांगला कमाई करणारा पुरूष लग्न करू इच्छित असेल, तर तो घरात भांडी धुणाऱ्या मोलकरणीशीही लग्न करू शकतो. पुरुष किती लवचिक आहेत ते पहा. तुम्हीही थोडी लवचिकता दाखवली पाहिजे. इतके कठोर होऊ नका.”
