मुंबईत भयंकर अपघात; तरुणानं जिच्यासोबत पाहिली सहजीवनाची स्वप्न तिला रक्ताच्या थारोळ्यातून उचललं…

आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणीचा लग्नाच्या तोंडावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. होणाऱ्या पतीसोबत दुचाकीवरुन जात असताना झालेल्या अपघातामध्ये तिला प्राण गमवावे लागले. या अपघातात तिचा पतीही जखमी झाला आहे. ही घटना मुंबईतील परळ परिसरात घडली.

25 वर्षीय निकिता दळवी असे मयत तरुणीचे नाव असून तिचा होणारा पती संदीप कुद्रे हा या अपघातामध्ये जखमी झाला आहे. वाहन चालकाच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 फेब्रुवारी रोडी साखरपुडा झाला होता. मूळ कोल्हापूरचा असलेला संदीप कुद्रे मुंबईत केसरी टूर्समध्ये नोकरीला आहे. त्याचे कांजुरमार्गला राहणाऱ्या निकितासोबत लग्न जमले होते. हे जोडपे 7 मे रोजी लग्न करणार होते.

असा झाला अपघात? 

सोमवारी संध्याकाळी संदीप निकिताला घरी सोडायला दुचाकीवरुन जात होता. हिंदमाता पुलावर ऑइलवरुन त्याची दुचाकी घसरली. याचवेळी बाजूने कार जात असताना ती निकिताच्या अंगावरुन केली. या अपघातानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि संदीप सायंकाळी 7.30 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हिंदमाता पुलावरुन उतरत होते. यावेळी त्यांची स्कूटर अचानक ऑइलवरुन घसरली आणि हे दोघेही डाव्या बाजूला घसरले. यावेळी निकितावरुन एक कार गेली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निकिताला संदीपने तात्काळ उचललं आणि केईएम रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. निकिता दळवी एका कंपनीत अकाऊंटट म्हणून काम करत होती. या घटनेनंतर निकिता आणि संदीप यांच्याघरी शोकाकुळ वातावरण आहे. संदीपसाठी निकिताचं असं जाणं चटका लावून गेलंय.

कोस्टल रोडवर अपघात 

मुंबईच्या कोस्टल रोडवर बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा थरारक Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिला तरी अक्षरश: अंगावर काटा येतो. एका बीएमडब्ल्यू कारच्या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कोस्टल रोड दिसत आहे. तसेच या रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहने जात असल्याचंही पाहायला मिळत आहे. पण या रस्त्यावरून अनेक वाहने जात असताना अचानक एक बीएमडब्ल्यू कार अतिशय वेगाने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच ही कार वेगाने आल्यानंतर समोर असलेल्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. पण ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतानाच ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हाईडरला धडक देऊन लेन बदलून विरुद्ध दिशेच्या डिव्हाईडरला धडकल्याचं दिसत आहे. हा अपघात 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *