बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये बंदची हाक! हिंसक वळणानंतर कडक पोलीस बंदोबस्त

संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या. धनंजय मुंडे यांच्यावर देखील खंडणी आणि कलम 302 चा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त मराठा समाजातील तरुणांनी धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळत निषेध व्यक्त केलाय. तर यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.ही खंडणी धनंजय मुंडे यांच्या निवडणूकीसाठी गोळा केलेली आहे. राजीनाम्यावर आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणात मुख्य आरोपी धनंजय मुंडे झाले पाहिजेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोप पत्रातून समोर आलेल्या फोटोज नंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बाईक रॅली काढून शांततेत बंदचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. मात्र केज शहरात बंदला हिंसक वळण लागले. काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदविला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांना या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

बीडनंतर उद्या धाराशिव बंदची हाक 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी करा. या मागणीसाठी उद्या धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या बंद पुकारण्यात आलाय. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *