रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, स्वयंचलित चालक चाचणी केंद्र, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालकांना अनुशासित करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भविष्यात रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालविण्याबाबत प्रबोधन आणि अनुशासनच्या माध्यमातून शिक्षित करण्याचे मोठे आव्हान परिवहन विभागाने स्वीकारणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटार परिवहन विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘परिवहन भवन’च्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान सांगितले.

वरळी येथे परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ या इमारतीचे भूमिपूजन रविवारी देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते पार पडले. सुमारे १२,८०० चौ.मी. बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एका वेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनराव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *