मुंबईकरांसाठी मार्च असह्य उकाड्याचा महिना

गेल्या आठवड्यात चढा असलेल्या तापमानाच्या पाऱ्यात आता काहीशी घट झाली असली तरी मुंबईकरांना आता तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहावे लागणार आहे. यंदा उन्हाळ्यात (मार्च ते मे) मुंबईत कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रताही अधिक असेल.

फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उकाडा आणि उन्हाचा तडाखा सुरू झाला. कमाल तापमानाने सरासरी ओलांडली. आता मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३२.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी अधूनमधून त्यात वाढ होईल. हवामान उष्ण व दमट असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *