सूक्ष्म अन्न प्रक्रियेत राज्य अव्वल; २२,०१० प्रकल्पांना मंजुरी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्याोग योजनेच्या अंतर्गत राज्यात एकूण २२,०१० प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १,८९५ प्रकल्प मंजूर आहेत. देशात २२,००० चा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

केंद्र सरकारच्या मदतीने देशभरात कृषी व अन्न प्रक्रिया उद्याोगाला चालना दिली जात आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राज्याच्या खालोखाल बिहारमध्ये २१,२४८ प्रकल्प मंजूर असून, ते देशात दुसऱ्या स्थानावर तर उत्तर प्रदेशात १५,४४९ प्रकल्प मंजूर असून, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम क्रमांकावर, अहिल्यानगर द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेच्या माध्यमातून २,२६३ कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाली आहे. अनुदानापोटी ३८९ कोटी रुपये लाभार्थींना वितरित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *