न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर पोलीस बंदोबस्त, खातेधारकांची गर्दी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात काल माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. याचबरोबर विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षेनेतेपदी निवड करण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी फडणवीस नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ते महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *