रायगड जिल्‍हा परीषदेत कोटयवधींचा भ्रष्टाचार; वेतन फरक दाखवून कर्मचाऱ्याने रकमा आपल्या खात्यात वळवल्या

रायगड जिल्‍हा परीषदेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने पगार बीले तयार करताना कर्मचाऱ्यांचे नसलेले कपात किंवा वेतन फरक दाखवून, या रकमा तो आपल्‍या खात्‍यावर वळवत असे. अन्‍य विभागात कार्यरत असताना कोरडे याने असे उपदव्‍याप केल्‍याची बाब समोर आली आहे. नाना एकनाथ कोरडे असं त्‍याचं नाव आहे. दरम्‍यान या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी पाच सदस्‍यीय चौकशी समिती गठित करण्‍यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.

नाना कोरडे हा  पाणी पुरवठा विभागात वरिष्‍ठ सहायक लिपीक म्‍हणून कार्यरत आहे. तो कर्मचारयांची वेतन बीले तयार करण्‍याचे काम करीत असे. ही बीले तयार करताना कर्मचारयांची मागील थकबाकी किंवा वेतन फरकाची रक्‍कम दाखवत असे. त्‍याचे धनादेश स्‍वतःच सहया करून बनवत असे व ही रक्‍कम परस्‍पर स्‍वतःच्‍या किंवा पत्‍नीच्‍या खात्‍यावर वर्ग करत असे. गेली दीड वर्षे हा प्रकार सुरू होता. सध्‍या तो पाणी पुरवठा विभागात कार्यरत असून तिथं त्‍याने १ कोटी १९ लाख रूपये अशा प्रकारे हडप केल्‍याचे प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. या प्रकरणातील ६८ लाख रूपये त्‍याने दोन धनादेशांव्‍दारे जिल्‍हा परीषदेला परत केले आहेत. नाना कोरडे हा यापूर्वी एकात्मिक बालविकास विभागात कार्यरत होता तिथंदेखील त्‍याने असे प्रकार केल्‍याची बाब समोर आली आहे. हा एकूण अपहार ४ ते ५ कोटी रूपये इतका असण्‍याची शक्‍यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *