तालुक्यातील साकोरे मिग येथील बालकाच्या हत्या प्रकरणातील निर्दयी माता आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. २० डिसेंबर २०२४ रोजी परिसरातील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रात एका गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
कोपरगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने चिमुकल्याची ओळख पटवली होती. कार्तिक ज्ञानेश्वर बदादे (वय ४) असे मयत चिमुकल्याचे नाव असून, तो साकोरे मिग येथील असल्याची माहिती समोर आली होती.
