गोळी झाडली रानडुकरावर, आवाज आला माणसाचा! पालघरमध्ये हत्या प्रकरणी 9 मित्रांना अटक

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात शिकार करण्यासाठी गेलेल्या काही गावकऱ्यांच्या गटाने आपल्याच गटातील एका व्यक्तीला रानडुक्कर समजून गोळी घालून ठार केल्याची घटना घडली. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना 28 जानेवारी रोजी रात्री बोरशेती जंगल परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

29 जानेवारी रोजी मनोरमधील बोरशेती वनक्षेत्रात रानडुक्करांच्या शिकारीसाठी एक गट गेला होता. तिथे गेल्यानंतर हा गट वेगळा झाला. त्यानंतर त्याच गटातील एका शिकाऱ्यांने एका सदस्याला रानडुक्कर समजून त्याच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेनंतर गटातील दुसरे सदस्य देखील घाबरले आणि गोंधळलेल्या अवस्थेत त्यांनी त्या मृत  व्यक्तीचे शव हे तिथे असणाऱ्या झाडाझुडपांत लपवले. या घटनेची कोणतीच माहिती पोलिसांना समजली नाही. मात्र, 1 फेब्रुवारी रोजी मृत व्यक्तीच्या पत्नीने बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. या प्रकरणी गुप्त माहिती मिळाल्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 9 जणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी शोध मोहिमेनंतर त्या मृत व्यक्तीचा मृतदेह सापडला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. परंतु, अद्याप त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे शोधले जात आहे, असे धाराशिवकर यांनी सांगितले.

मनोर पोलिसांनी आरोपींवर कलम 105, कलम 238, कलम 3(5) यासह अनेक कलमांखाली आरोप लावले आहेत. या प्रकरणी अंकुश मेहलोदा नावाचा आणखी एक गावकरी शिकारीच्या दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मृत पावल्याची बातमी समोर आली आहे. परंतु, धाराशिवकर यांनी मेहलोदा यांचा 30 जानेवारी रोजी दीर्घ आजाराने मृ्त्यू झाल्याची पुष्टी केल्यानंतर हे वृत्त फेटाळून लावले. त्याचा गोळीबाराच्या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *