दहिसरमध्ये दोन वर्षांपूर्वी एका तरुणावर त्याच्याच प्रेयसीला पाण्याच्या टाकीवरुन धक्का दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली होती. तर, युवकावर खुनाचा खटला चालवण्यात आला होता. मात्र आता कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली आहे. स्वतः पिडीतेनेच कोर्टात तरुणावरील आरोप फेटाळले असून त्याची सुटका करण्यात यावी, असं अवाहन करण्यात आलं आहे. ही घटना नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती. युवकाचे नाव अमी डरेकर असून त्याचं वय 28 वर्ष आहे. तर, पीडितेचे नाव प्रियांगी सिंह असे असून ती बीपीओ कर्मचारी आहे व तिचे वय 26 वर्ष आहे.
दहिसर येथील एका उंच इमारतीमध्ये अमी डरेकर आणि प्रियंगी सिंह ड्रिंक्स करत होते. प्रियांगीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, अमीनेच तिला पाण्याच्या टाकीवरुन खाली धक्का दिला. प्रियांगी यात गंभीर जखमी झाली होती. तिचे डोके, मणका आणि हाड फ्रॅक्चर झाली होती. अमीवर आयपीसी कलम 307 अंतर्गंत हत्येचा आरोपाततर्गंत गुन्हा दाखल केला होता. या कलमांतर्गंत जन्मठेपेची शिक्षेची तरतूद आहे.
या प्रकरणात पाच जणांनी साक्षदेखील दिली होती. प्रियांगी सिंहने मात्र तिची साक्ष देताना म्हटलं होती की, तिला 12 नोव्हेंबर 2022 च्या रात्रीच्या घटनेबद्दल काहीच आठवत नाही. तिच्या वडिलांनी सांगितलेल्या घटनेने मोठा धक्का बसला आहे. सततच्या कोर्टाच्या सुनावणीमुळं मला ही घटना विसरताच येत नाहीये. हे प्रकरण इथेच संपवण्यात यावे. अद्यापही प्रियंकाच्या जखमा भरल्या नाहीत. ती अजूनही व्हिलचेअरवरच आहे. तसंच, मुलाला उगाचच त्रास देण्यात अर्थ नाही त्याच करिअरदेखील बर्बाद होईल, असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
2 जानेवारी 2024 रोजी प्रियांगीने कोर्टात म्हटलं होतं की, माझं डोकं आणि पायाला अनेक जखमा आहेत. मला माहिती नाहीये मी कशी जखमी झालीये. मी घटनेच्या दिवशी सप्टेंबर 2023 पर्यंत रुग्णालयात होते. बचाव पक्षाच्या वकिलांच्या महिलाच्या व्हिडिओ असलेल्या जबाब ट्रान्सक्रिप्ट चार्जशीट दाखल आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आणि जामीन अर्ज फेटाळल्यानंतर महिलेच्या व्हिडिओ स्टेटमेंटची ट्रान्सक्रिप्ट देण्यात आली होती, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. पीडिता स्वतःहून पडली असावी असे ट्रान्सक्रिप्टमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी कोर्टाने अमी डरेकरची सुटका करण्यात आली आहे. प्रियांगी सिंहच्या साक्ष आणि परिवाराच्या जबाबानंतर निर्णय घेण्यास मुख्य भूमिका बजावली आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. प्रियांगी आत्ताही सावरते आहे. तर, अमीला दोन वर्ष जेलमध्ये ठेवावे लागले.